मुख्यमंत्री भुसावळात मुक्कामी राहण्याची शक्यता कमीच


जामनेरच्या सभेनंतर दुसर्‍या दिवशी भुसावळात उपस्थिती ; पोलिस उपअधीक्षकांनी घेतला बंदोबस्ताचा आढावा

भुसावळ- महाजनादेश यात्रेनिमित्त भुसावळात 7 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस येत असल्याची शक्यता कमीच असून जामनेरच्या सभेनंतर ते मुंबई जातील व दुसर्‍या दिवशी 8 रोजी पुन्हा भुसावळात येतील, अशी माहिती आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पार्श्‍वभूमीवर डीवायएसपी कार्यालयात आमदार संजय सावकारे व डीवायएसपी गजानन राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी बैठक घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर बसणार्‍या मान्यवरांची नावे, हेलिपॅड स्थळ तसेच बंदोबस्ताचे नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली.

8 रोजी भुसावळात होणार सभा
मुख्यमंत्री फडणवीस हे 7 ऑगस्ट रोजी महाजनादेश यात्रेनिमित्त शहरात येत असून दुसर्‍या दिवशी 8 रोजी सकाळी 11 वाजता डी.एस.हायस्कूलच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील नेवे, शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, रमा शंकर दुबे, पोलिस निरीक्षक देवीदास पवार, निरीक्षक बाबासाहेब ठोंबे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, छोटू वैद्य, नंदू सोनवणे, प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेच्या वेळी व्यासपीठावर कोण-कोण बसणार अशा मान्यवरांनी यादी द्यावी, अशा सूचना राठोड यांनी दिल्या शिवाय हेलिपॅडची जागा ही बियाणी मिलिटरी स्कूल अथवा आयुध निर्माणी येथील ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, 7 रोजी मुख्यमंत्री शक्यतो भुसावळात मुक्कामी राहणार नसल्याची माहिती असून ते जामनेरची सभा आटोपल्यानंतर परस्पर मुंबई जातील व दुसर्‍या दिवशी पुन्हा हेलिकॉप्टरने भुसावळात येणार असल्याचे समजते.


कॉपी करू नका.