ऐनगावात तरुणीचा विहिरीत पडल्याने मृत्यू
बोदवड : तालुक्यातील ऐणगाव येथील मुन्नीबाई रतीलाल भिलाला (16, रा.चिरीया, ता.भिकनगाव, जि. खरगोन) या अल्पवयीन तरुणीचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजता घडली. ही ऐनगाव येथील प्रमोद निवृत्ती पाटील यांच्या शेतात ही घटना घडली. याप्रकरणी सुभाष लालसिंग भिलाला (38) यांच्या खबरीनुसार बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास पोलिस उपनिरीक्षक भाईदास मालचे करीत आहेत.

