कुर्हा महाविद्यालय उमंग वार्षिक स्नेहसंमेलन
Kurha College Umang Annual Reunion कुर्हाकाकोडा : स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘उमंग’ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्नेहसंमेलनात ढोल-ताशा, लेझीम व स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. संस्थाध्यक्ष प्रमोद शिवलकर, कोषाध्यक्ष पुरणमल चौधरी, सचिव भालचंद्र कुलकर्णी, संचालक, प्रल्हाद बढे, दामूअण्णा सुरंगे, प्रभाकर सुशीर, महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन जोशी, अभिनव इंग्लिश मिडीयम शाळेचे प्राचार्य कोथळकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य चौधरी, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक जुनघरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा गुणगौरव
यावेळी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारीतोषिक देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर नृत्य, गायन, नाटिका, सादर केल्या. सूत्रसंचालन प्रा.भाग्यश्री ढगे, प्रा.अतुल तेली, विद्यार्थिनी पूर्वा गोसावी व अंजली बावस्कर यांनी केले. आभार प्रा.मनोज न्हावी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रा.जितेश कुलकर्णी, प्रा.मयूर कुंभार, प्रा.शीतल मस्के, प्रा.गीता वाघ, प्रा.नयना सुरडकर, प्रा.वृषाली शिमरे यांनी विशेष परिश्रम घेतले.


