भुसावळात पोलिसांच्या सतर्कतेने महिलेचे वाचले प्राण
भुसावळ : शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या दाम्पत्यात किरकोळ कारणावरील वाद विकोपाला गेल्यानंतर पतीने पत्नीविरुद्ध सोमवारी बाजारपेठ पोलिसात तक्रार नोंदवली होती तर त्यानंतर मंगळवारी उभयंतांमध्ये पुन्हा वाद विकोपाला गेल्यानंतर दाम्पत्य पुन्हा दुपारी 12 वाजता पोलिस ठाण्यात धडकले मात्र पत्नीचे रडणे काही केल्या थांबत नसल्याने पोलिसही हतबल झाले मात्र त्यातच पत्नीने पोलिस ठाण्यातून पळ काढत थेट रेल्वे लाईन गाठली व हा प्रकार पाहून पोलिस व तिचा पतीही मागे धावला. यावेळी गस्तीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा बल कर्मचार्याने सतर्कता दाखवत विवाहितेला आत्महत्येपासून रोखले. दरम्यान, याबाबत पोलिसात नोंद नसलीतरी या महिलेवर मानसिक आजारासंदर्भात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली.
