रावेरातील जनता दरबारात समस्यांचा पाढा
रावेरातील पाच तासांच्या दरबारात जागीच प्रश्न मार्गी लागल्याने व्यक्त झाले समाधान
रावेर- आमदार शिरीष चौधरी यांनी मंगळवारी घेतलेल्या जनता दरबारात नागरीकांनी आरोग्य, एस.टी.महामंडळ, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जलसंधारणासह इतर विभागाच्या संदर्भात नागरीकांनी प्रश्रांची सरबती केली. याला उत्तरे देतांना प्रशासनाची चांगलीच दमछाक उडाला. सुमारे पाच तास चाललेल्या जनता दरबारात आमदारांनी जागीच प्रश्न सोडवून जनतेला न्याय दिल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले.
पाच तास चालला जनता दरबार
रावेर तहसीकार्यालयात मंगळवारी तालुक्यातील नागरीकांच्या समस्या सुटण्यासाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला. यावेळी रावेर तालुक्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख या दरबाराला उपस्थित होते. यावेळी नागरीकांनी एक-एक करून आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे समस्या मांडल्या. आमदारांनी जनतेकडून उपस्थित झालेल्या प्रश्नांबाबत अधिकार्यांना विचारणा केली तर जनता दरबारात कोणताही गोंधळ झाला नाही शिवाय सर्वांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तरे मिळाली. तब्बल पाच तास जनता दरबार चालला.



यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष दारा मोहम्मद, राजीव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, यशवंत धनके, आसीफ मोहम्मद, योगराज पाटील, प्रकाश पाटील, हरीष गनवाणी, राजू सवर्णे, प्रतिभा बोरवले, दीपक पाटील, योगेश गजरे, सुरेश चिंधू पाटील, सोपान पाटील आदी उपस्थित होते.
या विभागांवर झाली प्रश्नांची सरबती
जनता दरबारात पंचायत समिती, आरोग्य, एस.टी.महामंडळ, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम, सिटी सर्वे विभाग, महसूल, महावितरण विभाग यांच्यावर नागरीकांनी प्रश्नाची सरबती केली. जनता दरबार सुरु असतांना अतिक्रमण कायम करण्यासाठी महिलांचा समुदाय घोषणाबाजी कीत आल्यानंतर प्रशासनाने समाधानकारक उत्तरे दिली.
या अधिकार्यांची होती उपस्थिती
यावेळी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, सीईओ रवींद्र लांडे, तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी सानिया नाकाडे, जिल्हा परीषदेचे बांधकाम विभागाचे चोपडेकर, रावेर पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे, महावितरणचे चौधरी,सामाजिक वनिकरणचे अर्षद मुलानी, वनविभागाचे मुकेश महाजन, अतुल तायडे, संजय भदाणे, अरविंद धोबी, आरोग्य अधिकारी शिवराज पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे इम्रान शेख, एस.टी.महामंडळचे बेंडकुळे, वन्यजीवचे राजेश पवार यांच्यासह सर्व विभागचे प्रमुख या जनता दरबारात उपस्थित होते.
