कोळगाव केंद्र संचालकासह तिघांविरुद्ध गुन्हा
इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत आढळली उत्तरपत्रिका
भडगाव : तालुक्यातील कोळगाव येथील परीक्षा केंद्र क्रमांक 917 गोपीचंद पुना पाटील महाविद्यालयात भरारी पथकाला कस्टडी रुममधील टेबलावर इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत लिहिलेली उत्तरपत्रिका व काही झेरॉक्स कॉपी आढळल्याने या बाबीची गंभीर दखल घेत केंद्र संचालक राजेंद्र संभाजी पाटील, कर्मचारी अरविंद जगन्नाथ सावंत व शिपाई भरत तुकाराम पाटील या तिघांविरुद्ध भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. मंगळवारी इंग्रजीचा पेपर सुरू असताना अचानक जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ.मंजुषा क्षीरसागर यांच्या भरारी पथकाने सकाळी 11:30 वाजता कोळगाव येथील या परीक्षा केंद्राला भेट दिली असता हा प्रकार उघडकीस आला.

