जळगावातील बांधकाम व्यावसायीकाची आत्महत्या
जळगाव : जळगावातील बांधकाम व्यावसायीक अनिल जगन्नाथ सूर्यवंशी (54, रा.अष्टभुजानगर) यांनी मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास तालुका पोलिस ठाण्यासमोरील अपार्टमेंटचे बांधकाम सुरू असलेल्या साईटवर गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमागील कारण अद्याप निष्पन्न झालेले नाही. मृत सूर्यवंशी यांच्या पश्चात पत्नी वैशाली, मुलगा डॉ.कृणाल व मुलगी कृतिका असा परीवार आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

