भुसावळसह यावलला ट्वेंटी-20 क्रिकेट निवड चाचणी 21 व 22 रोजी
भुसावळ : महाराष्ट्र राज्य ट्वेंटी-20 क्रिकेट संघटनेची नववी 15 वर्षाच्या आतील मुलांची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा नंदुरबार येथे 7 ते 9 फेब्रुवारी 2020 दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंची निवड शुक्रवार, 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता बियाणी पब्लिक स्कूलच्सर मैदानावर तर शनिवार, 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता डॉ.जाकिर हुसेन शाळा व ज्युनियर महाविद्यालय, मैदान शासकीय विश्रामगृहजवळ यावल येथे होणार आहे. 1 ऑक्टोबर 2005 नंतर जन्मलेल्या खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात स्वतःची बॅट घेऊन निवड चाचणीस उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव वासेफ पटेल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा महासंघटनेचे अध्यक्ष प्रा.आ. चंद्रकांत सोनवणे, डॉ.प्रदीप तळवलकर, प्रा.संजय चौधरी, प्राचार्य निना कटलर, क्रीडा शिक्षक रमण भोळे, प्रदीप साखरे, बी.एन.पाटील, राजू कुलकर्णी, मधुकर वाणी, अजय डोळे, खुशाल देशमुख, प्रा.आसिफ खान, गोपाल जोनवाल, मेघशाम शिंदे, राहुल कोळी, प्रतीक कुलकर्णी, तारीख अहमद यांनी केले आहे.

