धुळ्यातील डॉक्टरांचा एरंडोलनजीक अपघाती मृत्यू
एरंडोल : जळगावहून दुचाकीने धुळ्याकडे निघालेल्या डॉक्टरांचा राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल कृष्णा इनजवळ अपघाती मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. डॉ.अकील अब्दुल गफार मुजावर (43, रा.अक्सा नगर, माणिक दालवाले प्लॉट, वडजाई रोड, धुळे) असे मृत डॉक्टरांचे नाव आहे. जळगाव येथून डॉ.अकील मुजावर हे दुचाकी (क्रमांक एम.एच.18 बी.एफ.5001) ने धुळ्याकडे निघाले असताना त्यांची दुचाकी हॉटेल कृष्णा इनजवळील निर्माणाधीन पुलास धडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. मयताच्या खिशातील आधारकार्डावरून ओळख पटली.


