भुसावळकरांना दिलासा : हतनूर धरणातून अखेर सुटले आवर्तन


भुसावळ : शहरवासीयांवर पाणीटंचाईचे संकट कोसळण्यापूर्वीच बुधवारी हतनूर धरणातून एक हजार डे क्युसेसप्रमाणे साडेतीन हजार क्युसेसचे पहिले आवर्तन सोडण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. तापी नदीपात्रातील पालिका बंधार्‍याची जलपातळी घसरल्याने पालिकेने आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. अवघा आठ दिवस पाणीपुरवठा होईल इतकाच जलसाठा बंधार्‍यात असल्याने आवर्तनाची मागणी पालिकेने नोंदवली होती. या मागणीनुसार हतनूर धरणातून बुधवारी दुपारी 12 वाजता साडेतीन हजार क्युसेस पाण्याच्या विसर्गाला सुरूवात करण्यात आली. प्रती दिन एक हजार क्युसेस प्रमाणे साडेतीन दिवस पाणी विसर्ग केला जाणार आहे. येत्या चार ते सहा दिवसांत हा जलसाठा पोहोचेल. बंधार्‍यातील पाणीसाठा संपण्यापूर्वीच आवर्तनाचे पाणी उपलब्ध होणार असल्याने रेल्वे व भुसावळ शहराचा पाणीप्रश्न मिटणार आहे. हा जलसाठा पालिकेला आगामी महिनाभर पुरणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !