पुनखेडा पुलावरून ट्रक उलटला : वाहतूक ठप्प


रावेर : केळी वाहतूक करणार्‍या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने तो पुनखेडा पुलावरून उलटल्याची बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रक चालक रणजीत राणा हे जखमी झाले. या अपघातानंतर गुरुवारीदेखील या भागातील वाहतूक ठप्प असल्याने बारावी परीक्षेला जाणार्‍या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

ट्रक उलटला : चालक जखमी
जळगाव येथून जालंधरकडे केळी वाहतूक ट्रक (क्र.पी.बी.10 डी.एम. 9204) हा पुनखेडा गावाजवळील पुलावरून जात असताना अचानक ब्रेक निकामी झाल्याने तो पुलाखाली येवून उलटला. या अपघातात चालक जखमी झाल्याने क्लिनर शेख शहेजाद यांनी त्यास बाहेर काढत उपचारार्थ हलवले. दरम्यान, रावेर व मुक्ताईनगर आगारातून सुटणार्‍या एस.टी. बसेसची वाहतूक याच भोकर नदीपात्रातील पर्यायी रस्त्यावरून सुरू असल्याने बुधवारी उलटलेल्या ट्रकमुुळे वाहतूक ठप्प झाल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सोसावा लागला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !