भुसावळात उद्या महाशिवरात्रीनिमित्त ‘नुपूर’ महोत्सव


भुसावळ : शहरातील नुपूर कथक डान्स अ‍ॅकेडमीच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही महाशिवरात्री निमित्ताने शुक्रवारी सायंकाळी सात वाजता रेल्वेच्या श्रीकृष्णचंद्र सभागृहात नुपूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शास्त्रीय नृत्याच्या महोत्सवात विविध शास्त्रीय नृत्य प्रकार सादर केले जाणार आहे. यंदा हे महोत्सवाचे 23 वे वर्ष आहे. आतापर्यंत यात कथक सोबतच भरतनाट्यम, ओडीसी, कुचीपुडी, हे प्रकार सादर करण्यात आले. या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे नुपूर अ‍ॅकेडमीच्या 43 विद्यार्थ्यांच्या कथ्थक नृत्यासोबत पश्‍चिम बंगालमधील कोलकाता येथील कलावंत कथकली व मणिपुरी नृत्य सादर करणार आहेत.

अंशुमन गुप्ता यांना नृत्यश्री पुरस्कार घोषित
दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर शास्त्रीय नृत्यात वैशीष्टपूर्ण कामगिरी करणार्‍या कलावंतास हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या वर्षीचा पुरस्कार कोलकाता येथील कथकली नृत्य करणारे अंशुमन गुप्ता यांना घोषित करण्यात आला आहे दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही नुपूर कथक डान्स अ‍ॅकेडमीच्या वतीने होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घोषित केली जाणार आहे.
विनामूल्य सादार होणार्‍या कार्यक्रमाचा रसिक नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !