बोदवड बसस्थानकातून औरंगाबादच्या प्रवाशाचे पाकिट लांबवले
बोदवड : बोदवड-पुणे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने औरंगाबादच्या प्रवाशाचे पाकिट लांबवले. गुरूवारी सकाळी 8.55 वाजता ही घटना घडली. रामदास मोहन चिमवार (शिवाजी नगर, साई कॉलनी, वाळूज, औरंगाबाद) हे गुरुवारी सकाळी बोदवड बसस्थानकवरून सकाळी 8.55 वाजता बोदवड-पुणे बसमध्ये गर्दीत चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील 37 हजार 500 रुपयांची रोकड असलेले पाकिट लांबवले. या प्रकरणी बोदवड पालिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार कालिचरण बिर्हाडे करीत आहेत.
