मुक्ताईनगर तालुक्यातील संगोयो समितीकडून 1625 पात्र लाभार्थींची प्रकरणे मंजूर


मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील विधवा, दिव्यांग, वृद्ध यांची संजय निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेंतर्गत एक हजार 625 पात्र लाभार्थींना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील संजय गांधी निराधार समितीने मंजुरी दिली.

आजवर सात हजारांपेक्षा जास्त पात्र लाभार्थींना समितीने मंजुरी दिली. प्रकरणे मंजुरीसाठी समिती अध्यक्ष अनंतराव देशमुख, सूर्यकांत पाटील, मोहन बेलदार, पंकज पांडव, उमेश पाटील, जाफर अली, पुंडलिक सरक, रमेश महाजन, लीलाधर पाटील, नीलिमा देवानंद वंजारी, तहसीलदार वाळे काम पाहत आहे.


कॉपी करू नका.