वरणगाव पालिकेची अर्थसंकल्पीय सभा गाजली


सत्तेसाठी एकत्र आलेल्या दोन गटात फूट : तीन कोटींच्या विकास कामांना खीळ

वरणगाव : पालिकेची अर्थसंकल्पीय बैठक गुरुवारी चांगलीच गाजली. या बैठकीत समान निधी वाटप न झाल्याने निविदा रद्द करा, अशी मागणी केल्याने नगराध्यक्षांनी सभा तहकूब केली तणाव निर्माण होऊन पालिके बाहेर मोठ्या प्रमाणावर नागरीकांचा जमाव जमल्यानंतर घोषणा देण्यात आल्याने काही काळ वातावरण तापले होते अडीच वर्षांपूर्वी सत्ता स्थापनेसाठी एकत्र आलेले दोन पक्ष निवडणुकीपूर्वी विरोधक झाल्याचे चित्र समोर पहायला मिळाले तर तब्बल तीन कोटी रुपयांच्या विकास कामांना खीळ बसली. पालिकेची अर्थसंकल्पयीय बैठक सकाळी 11 वाजता सुरू झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुनील काळे होते. मुख्याधिकारी श्याम गोसावी व उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विरोधी पक्षनेते राजेंद्र चौधरी माजी नगराध्यक्ष अरूणा इंगळे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
सभेच्या सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त लेखी स्वरूपात मागूनदेखील पालिकेने दिले नाही यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व भारतीय जनता पार्टी खडसे गटाच्या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले यानंतर नगराध्यक्षांनी हीी माहिती दोन दिवसात देतो असे लेखी दिल्यानंतर हा वाद मिटला. त्यानंतर पहिल्या अकरा विषयाची चर्चा होऊन बाराव्या विषयावर जात असताना स्वच्छतेे व्यतिरिक्त बगीच्या विकासासाठी 14 व्या वित्त आयोगातून निधी देता येतो का असा प्रश्न नगरसेवकांनी विचारला असता त्याचे उत्तर हो मिळाल्यानंतर सभेसमोर ठराव घेऊन अंतिम निविदा मंजूर करण्यासाठी आज ठेवण्यात आलेल्या ठराव 7 ते 11 नामंजूर करण्यात येत असल्याचे पत्र खडसे गट राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व अपक्ष अशा 11 नगरसेवकांनी पत्र दिले तसेच नगराध्यक्षां यांनी स्वतःच्या प्रभागात सव्वा कोटी रुपयांची कामे घेतल्याने पदाचााा दुरुपयोग केला व निधीचा समसमान वाटप करा अशी मागणी केली यावेळी सभाअध्यक्ष सुनील काळे यांनी विकास कामांना विरोध होत असल्याने सदरची सभा तहकूब करण्यात येत आहे, असे सांगत राष्ट्रगीत सुरू केले. यानंतर नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसुफ, मेहणाज पिंजारी, नसरीन बी कुरेशी, माला मेढे हे सभागृहातून बाहेर पडल्यानंतर उर्वरित 11 नगरसेवकांनी सभागृहाचे दार बंद करत आमच्यापैकी एक अध्यक्ष निवडून सभा सुरू ठेवावी, अशी मागणी मुख्याधिकारी श्याम गोसावी यांच्याकडे केली परंतु याला नकार देत जवळपास 45 मिनिटं हा वाद सुरू होता तोपर्यंत नगरपालिकेच्या बाहेर चारशे ते पाचशे लोकांचा जमाव जमून घोषणाबाजी सुरू झाली, विकास कामांना विरोध करू नका कामे होऊ द्या अशा घोषणा सुरू झाल्या. यानंतर 12 नगरसेवक जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यासाठी जळगाव येथे निघून गेल्यानंतर या वादावर पडदा पडला.



सत्तास्थापनेसाठी आलेले दोन पक्ष झाले विरोधक
अडीच वर्षांपूर्वी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपमध्ये फूट पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना अपक्ष यांच्या मदतीने नगराध्यक्ष पदावर सुनील काळे यांची वर्णी लागली व भाजपचेच पाच नगरसेवक सत्ताधारी असताना विरोधक म्हणून बसावे लागले परंतु गुरुवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सत्तेत सहभागी असलेले नगरसेवक विरोधकाची भूमिका बजावत होते. निवडणुकीपूर्वी सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या दोन पक्ष विरोधक झाल्याचे चित्र निर्माण होते

लोकशाहीचा झाला खून -गटनेता
आजपर्यंत विकासकामांना कधीही विरोध केला नाही व पुढे करणार नाही मात्र आजची सभा ही अर्थसंकल्पीय सभा होती व पुढील एक वर्षाचे नियोजन यात करणार होते परंतु 14 व्या वित्त आयोगातून नगराध्यक्षांनी स्वतःच्या प्रभागात सव्वा कोटीची कामे घेऊन इतरांवर ती अन्याय केला याचा जाब विचारला सभा तहकूब केल्याने एक प्रकारे लोकशाहीचा खून झाला समान निधी वाटप होत नाही तोपर्यंत विरोध असेल, असे गटनेता राजेंद्र चौधरी म्हणाले.

विकास कामांना विरोध -नगराध्यक्ष
14 व्या वित्त आयोगातून इतरांच्या प्रभागात कामे याअगोदर केलेली आहे जागा उपलब्धतेनुसार बगीच्याचे कामे घेण्यात आलेली आहे यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे परंतु चांगल्या कामांना विरोध केल्याने विकास कामांना खीळ बसली असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !