अवैध धंदे चालकांशी सलगी भोवली : जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील तिघे कर्मचारी ‘कंट्रोल जमा’


जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगलेंच्या आदेशानंतर पोलिस दलात खळबळ

जळगाव : अवैध धंदे चालकांशी असलेली सलगी जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील तिघा कर्मचार्‍यांना चांगलीच भोवली आहे. तिघाही पोलिस कर्मचार्‍यांना गुरुवारी . सायंकाळी पोलिस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी कंट्रोल जमा (मुख्यालयी) केल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. मनोज सुरवाडे, किशोर पाटील व विजय पाटील अशी त्या कर्मचार्‍यांची नावे आहेत.

हप्ते गोळा करण्याच्या तक्रारी भोवल्या
अवैध दारुचा व्यवसाय करणार्‍यांसह सट्टा, वाळू वाहतूक करणार्‍यांकडून काही पोलिसांकडून सर्रास हप्ते उकळले जात असल्याच्या तक्रारी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे होत्या शिवाय काही दिवसांपूर्वीच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना जिल्ह्यात प्रत्येक पोलिस ठाण्यातील चाललेल्या प्रकाराची माहिती दिली होती. त्यानुसार डॉ. उगले यांनी स्वतंत्र पथकामार्फत या प्रकरणांची चौकशी सुरू केल्यानंतर गुरुवारी पहिला फटका जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील तिघा कर्मचार्‍यांना बसल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !