बडनेरा नाशिक मेमू गाडी 21 मार्चपर्यत रद्द


भुसावळ : चाळीसगाव येथे यार्ड रीमोल्डींग कामासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम होत असल्याने बडनेरा-नाशिक मेमू गाडी रद्द करण्यात आली आहे. ही गाडी 21 मार्चपर्यंत रद्द राहणार आहे. 01212 नाशिक-बडनेरा विशेष गाडीला रद्दसाठी मुदत वाढ 21 मार्चपर्यंत देण्यात आली आहे. दोन्ही बाजूची गाडी रद्द राहणार आहे. रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !