राज्यमंत्री आमदार बच्चू कडूंनी घेतले आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन
मुक्ताईनगर : महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी संत मुक्ताई नवीन मंदिरावर सकाळी 8.30 वाजता संत मुक्ताईचे दर्शन घेतले. भाविक भक्तांशी प्रसंगी त्यांनी संवाद साधला. यावेळी संस्थाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्याकडून मुक्ताई मंदिरासंदर्भात माहिती देण्यात आली. प्रसंगी संस्थाध्यक्ष अॅड.रवींद्र भैय्या पाटील, ईश्वर रहाणे, मंदिराचे व्यवस्थापक रवींद्र हरणे, विनोद सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय सापधरे, कल्याण पाटील, वारकरी कीर्तनकार आदी भक्त मंडली उपस्थित होती.

