मुक्ताईनगरात महिला भाविक बसखाली आल्याने ठार
मुक्ताईनगर : मुक्ताई यात्रोत्सवासाठी आलेल्या शेगावातील महिला भाविकेचा बसखाली आल्याने मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. कोकिळाबाई महादेव भारसकळे (55, लोसर, ता.शेगाव) असे मयत महिला भाविकेचे नाव आहे. मुक्ताईनगर बसस्थानकासमोर कोकिळाबाई या ऑटो रीक्षातून उतरत असतानाच महिलेचा तोल गेल्याने पाठीमागून मुक्ताईनगर आगाराची बस (क्र.एम.एच.20 बी.एल.3555) च्या मागील चाकात आल्याने त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी जखमी अवस्थेत त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय हलवले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

