रावेरच्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू
रावेर : दोन दुचाकी पाठीमागून एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात रावेरातील तुळशीराम सोमा महाजन (रा.महात्मा फुले चौक, रावेर) यांचा मृत्यू झाला. गुरुवारी हा अपघात झाला. रावेर-रसलपूर रस्त्यावरील भूत बंगल्याजवळ एका-पाठोपाठ एक चालणार्या दुचाकींची धडक होवून दुचाकीस्वाराच्या पाठीमागून बसलेले तुळशीराम महाजन गंभीर जखमी झाले. त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीस्वार वसंत रुपचंद महाजन हेदेखील जखमी झाले. धडक देणार्या अज्ञात दुचाकी चालकाने घटनास्थळावरून पलायन केले असून त्याच्याविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील कदम करत आहेत.

