भुसावळातील अॅड.नितीन खरे यांची नोटरी पब्लिकपदी नियुक्ती
Appointment of Adv. Nitin Khare as Notary Public from Bhusawal भुसावळ : जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ज्ञ तसेच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे अॅड. नितीन खरे यांची नुकतीच विधी व न्याय विभाग भारत सरकारद्वारा नोटरी पब्लिक म्हणून नियुक्ती करण्यात आली.. विधी व न्याय विभाग भारत सरकारद्वारा नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड यादीद्वारे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल अॅड.खरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


