गाडगेबाबांच्या कार्याचा सर्वच समाजाने आदर्श घ्यावा


जयंती उत्सवात पोलिस निरीक्षक भागवत यांचे प्रतिपादन

भुसावळ : संत गाडगेबाबांच्या जिवनाचा व कार्याचा सर्वच जाती, धर्म व समाजाने आदर्श घ्यावा. असे आवाहन बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांनी केले. श्री. संत गाडगे महाराज परिट धोबी सेवा संस्थेतर्फे रविवारी गाडगेबाबा जयंती निमित्त झालेल्या विविध कार्यक्रमांत ते बोलत होते. श्री संत गाडगेबाबांची 144 वी जयंती जळगावरोडवरील गाडगेबाबा मंदिरात साजरी करण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या हस्ते प्रतिमा व मुर्तीचे पुजन करण्यात आले. यावेळी निरीक्षक भागवत यांनी गाडगेबाबा यांच्या जिवनातील काही क्षण सांगून उपस्थितांना अंर्तमुख केले. स्वच्छता, गोरगरिबांना अन्नदान यासाठी आयुष्यभर कार्य करणार्‍या संत गाडगेबाबा यांचा जिवनाचे कार्य प्रत्येकाने सखोल अभ्यासले पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी बिसन बाविस्कर व सहकार्‍यांनी गाडगे महाराजांच्या जिवनावर किर्तन सादर केले. यावेळी श्री. संत गाडगे महाराज परिट धोबी सेवा संस्थेची नवीन कार्यकारीणी जाहिर करण्यात आली. यात अध्यक्षपदी रमेश ठाकरे, उपाध्यक्ष कैलास शेलोडे, कार्याध्यक्ष बिसन बाविस्कर, सचिन मनिष बाविस्कर, खजिनदार लक्ष्मण शेलोडे, सहसचिव माधव बोरसे, संपर्क प्रमुख येवलेकर, प्रसिध्दी प्रमुख वामन सपकाळे, सदस्य नरेंद्र वाघ, गोपाळ बाविस्कर, एकनाथ वाघ आदींची निवड करण्यात आली. यावेळी नारायण तिवणे, दिनेश जामोदकर, महेंद्र आहिरे, चंद्रकांत बाविस्कर, कल्पना शेलोडे, प्रिती वाघ, शो :भा निंबाळकर, रेखा बोरसे, मंगला सपकाळे,कल्पना बाविस्कर, विजया ठाकरे, जोत्सा निंबाळकर, पुनम तिवणे आदी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !