नगरसेविकेच्या पतीविरुध्द 46 लाखांच्या खंडणीचा गुन्हा
तीन संशयीत आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात
भुसावळ : नागपूर येथील प्लॉट विक्रीच्या कारणावरुन शहरातील एकास 46 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांत शनिवारी रात्री नगरसेविका मंगला आवटे यांचे पती संजय आवटे यांच्यासह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेतले आहे. फिर्यादी भारत मोतीराम गिरणारे (रा.भुसावळत्र यांचे वडिलांचा नागपुर येथे तीन गुंठ्यांचा प्लॉट आहे. हा प्लॉट फिर्यादीचे वडील यांनी प्रसन्ना दत्तात्रेय टोकेकर, रा. नागपुर यांना खरेदी दिला. त्याचा व्यवहार पूर्ण झाला आहे, असे असताना फिर्यादी यांचेकडून पैसे उकळण्याच्या हेतूने संथयीत आरोपी भुर्या बारसे याने फिर्यादी भारत गिरणारे यांना फोन करून संशयीत आरोपी संजय आवटे यांच्या ऑफिसवर बोलवले. तेथे फिर्यादी गिरणारे आल्यानंतर भु-या बारसे व आणखी एका अनोळखी इसमाने फिर्यादीचा मोबाईल हिसकावून घेऊन नागपुर के प्लॉटका विषय अपने पास आया है, ऊस लोटाके 46 लाख रुपये मुझे अभी चाहिये नही तो तेरे परिवार को छोडूंगा नही अशी धमकी दिली. त्यानंतर संशयीत आरोपी संजय आवटे याने देखील 46 लाख रुपये आत्ताच्या आत्ता द्यावे लागतील नाही तर तुझे काय खरे नाही, असे म्हणून त्याने धमकी दिली. याबाबत फिर्यादी गिरणारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री 10 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड ,पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
विहिरीत ढकलण्याची धमकी
संशयीत आरोपी संजय आवटे यांच्या ऑफिसमधून फिर्यादी गिरणारे यांना 555 क्रमांकाच्या बोलेरो गाडीतून आवटे यांच्या साकरी फाट्यावरील फार्म हाउसवर घेऊन गेले. तिथे गेल्यावर सर्वांनी मिळुन मारहाण केली. तसेच फिर्यादीस विहिरीत ढकलून देण्याची धमकी दिली तसेच तेथे रशीद नावाचे आरोपी व एक अनोळखी व्यक्तीने 46 लाख रुपयांची खंडणी मागुन जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.
तीन संशयीत ताब्यात
खंडणी प्रकरणातील दाखल गुन्ह्यात संशयीत आरोपींबाबत पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळलेल्या गुप्त माहितीवरुन भु-या बारसे रा. वाल्मिकी नगर भुसावळ, किशोर उर्फ सुधाकर टोके रा. गांधीनगर (संजय आवटे यांचे गाडीवरील चालक) अनिल किशोर डागोर रा.वाल्मीक नगर. अशांना सापडा रचून वाल्मिक नगर भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, तस्लिम पठाण, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, महेश चौधरी, तुषार पाटील, समाधान पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी अशानी केली आहे .

