सुकी नदीपात्रातून अवैध गौणखनिज वाहतूक : तहसीलदारांनी ट्रॅक्टर केले जप्त
रावेर : सुकी नदी पात्रातून अवैध गौण खनिज वाहतूक करताना तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या टिमने ट्रॅक्टर जप्त केल्याने अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. चिनावल गावानजीक असलेल्या सुकी नदीपात्रातून अवैध गौणखनिजाची वाहतूक होत असताना तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली चिनावल सरपंच पोलिस पाटील, मंडळ अधिकारी खिरोदा संदिप जैस्वाल, उमेश बाभुलकर तलाठी चिनवाल, अजय महाजन, तलाठी सावखेडा बु , फिरोज कोतवाल यांनी सयुंक्त कार्यवाही करून ट्रॅक्टर रावेर तहसीलला जमा केले.
