यावल तालुक्यात प्रिपेड वीज मीटरला विरोध
Opposition to prepaid electricity meter in Yaval taluka यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथे निरंकार सेवा पीठ, मसाला, पापड, भात गिरणी मालक व कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेश या संघटनेच्या यावल तालुका कार्यकारीणीच्या बैठकीत पीठ गिरणीकरीता बसवण्यात येणार्या प्रिपेड मीटरला विरोध करण्यात आला. जुन्या मीटरमध्ये एका युनिटला 10 किलो धान्य दळले जात असेल तेच धान्य प्रीपेड मीटरमध्ये कमी प्रमाणात म्हणजे 10 किलोपेक्षा कमी दळले जात असेल तर ते प्रीपेड मीटर संघटना कोणत्याही गिरणीला बसवू देऊ नये, असा ठराव करण्यात आला.
प्रिपेड वीज मीटरला तीव्र विरोध
किनगाव येथे निरंकार सेवा पीठ, मसाला, पापड, भात गिरणी मालक व कामगार महासंघाची बैठक घेण्यात आली. या सभेस महाराष्ट्र राज्य महासंघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे उपस्थित होते. गिरणी मालकांना मार्गदर्शन करताना त्यांनी प्रीपेड मीटर बसवतांना महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या पीठ गिरणी संघटनेच्या तालुका कार्यकारणीला प्रीपेड मीटरची टेस्टिंग करून दाखवणे गरजेचे आहे. जुन्या मीटरमध्ये एका युनिटला 10 किलो धान्य दळले जात असेल तेच धान्य प्रीपेड मीटरमध्ये कमी प्रमाणात म्हणजे 10 किलोपेक्षा कमी दळल जात असेल तर ते प्रीपेड मीटर संघटना कोणत्याही गिरणीला बसवू देऊ नये, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. याबाबतचे निवेदन राज्य सरकारकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.


वीज दरात सवलतींची मागणी
पीठ, मसाला, पापड भात, गिरणींना शेतीपूरक गृह उद्योगात घेऊन अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करावे, बांधकाम कामगाराप्रमाणे शासकीय सवलती मिळाव्यात.लाईट बिलात कपात करून वीज दरात सवलत मिळावी, जेणेकरून लोकांचे धान्य कमी दराने दळता येईल, असा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला. लाईट बिलामध्ये भरमसाठ वाढ झाल्याने आज 7 ते 8 रुपये प्रति किलोप्रमाणे धान्य दळले जात आहे मात्र प्रिपेड मीटर बसवल्यानंतर हेच धान्य 10 ते 12 रुपये प्रमाणे दळावे लागेल व यात सर्वसामान्य नागरीकांचे मोठे नुकसान होईल व याची काळजी शासनाने घ्यावी तसेच गिरणी मालक व कामगार यांना वयाच्या 50 वर्षानंतर मानधन योजना राबवावी व संरक्षण विमा योजनेतही समावेश करावा, अशी मागणी सरकारकडे करण्यासाठी ठराव करण्यात आला.
यांची बैठकील उपस्थिती
या बैठकीत तालुका संपर्क प्रमुख जितेंद्र तेली, तालुकाध्यक्ष दीपक महाजन, संतोष सूर्यवंशी, पराग कुरकुरे, निरंजन चौधरी, नितीन चौधरी, विलास सोनवने, योगेश चौधरी, अयज खान, संतोष चौधरी, सय्यद नूर, मनोज गाजरे, विजय कोळी, दत्तात्रय महाजन, मधुकर महाजन, रवींद्र चौधरी आदींची उपस्थिती होती.
