भुसावळात आजपासून ‘स्नेहयात्री करंडक’ : राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत दोन दिवसात सादर होणार तब्बल 14 नाटके

मुंबई, सोलापूर, नागपूर, नाशिक, जळगाव सह एकूण 13 संघांचा सहभाग


भुसावळ : शहरातील स्नेहयात्री प्रतिष्ठान आयोजीत ‘स्नेहयात्री करंडक’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला शनिवार, 23 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपासून रेल्वेच्या श्रीकृष्णचंद्र सभागृहात प्रारंभ होईल. 23 आणि 24 मार्च या दोन दिवसात नाट्य रसिकांना तब्बल 14 नाटकांची मेजवानी मिळणार आहे.

पहिल्या दिवशी सात नाटकांची मेजवानी
पहिल्या दिवशी शनिवार, 23 मार्च रोजी दुपारी 12 वाजता नाट्यदर्पण अकोला संस्थेचे ‘त्या रात्री’, दुपारी एक वाजता इन्स्टीट्यूट ऑफ पीपल्स, नागपूर या संस्थेचे ‘चला निघायची वेळ झाली’, दुपारी दोन वाजता मायको एम्पॉईज फोरम, नाशिक संस्थेचे ‘द पॅकेज’, दुपारी 3.30 वाजता खान्देश नाट्य प्रतिष्ठान, जळगाव संस्थेचे ‘भृगसंहितेची पाने’, दुपारी 4.30 वाजता, फनकार क्रिएटीव्ह, अहमदनगर या संस्थेचे ‘जरा गुतलंय’, दुपारी 5.30 वाजता द थिएटर सर्कल, संभाजीनगर या संस्थेचे ‘जरा हटके’ आणि संध्याकाळी सात वाजता स्नेहयात्री प्रतिष्ठानची निर्मिती असलेले ‘झेंडूचं फुल’ या गाजलेल्या दोन अंकी नाटकाचा विशेष प्रयोग सादर होईल.



रविवारी या नाटकांचे सादरीकरण
रविवार, 24 मार्च रोजी सकाळी 10 वाजता, वैभव-दीप नाट्यसंस्था, कोल्हापूर संस्थेचे ‘मै हूं ना’, सकाळी 11 ते 12 वाजता नाट्यगंधर्व, डोंबिवली संस्थेचे ‘दीन तैसी रजनी’, दुपारी 12 ते 1 वाजता शोमॅन्स क्रिएशन्स, नाशिक संस्थेचे ‘रंसुरी’.
दुपारी 2 ते 3 वाजता कलासक्त, मुंबई संस्थेचे ‘संपर्क क्रमांक’, दुपारी 3 ते 4 वाजता स्कूल ऑफ हार्टस, नाशिक संस्थेचे ‘इनर लगेज’, दुपारी 4.30 ते 5.30 वाजता क्रिएटीव्ह कार्टी, अंधेरी या संस्थेचे ‘इन्ट्रोगेशन’, दुपारी 5.30 ते 6.30 वाजता स्वामी नाट्यांगण, डाबिीवली या संस्थेचे ‘फक्त दोन मिनीट’ तसेच संध्याकाळी सात वाजता ‘स्नेहरंग’ या सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच मान्यवरांच्या उपस्थितीत पारीतोषिक वितरण समारंभ होईल. दोन दिवसात तब्बल 14 नाटकांची मेजवानी रसिकांना लाभणार आहे. सर्व नाटकांसाठी प्रेक्षकांसाठी प्रवेश नि:शुल्क असून नाट्यरसिकांनी या भरगच्च मेजवानीचा लाभ घ्यावा, अशी माहिती प्रकल्प प्रमुख हरीश कोळी यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.

दोन सिने मालिका कलावंतांची उपस्थिती
स्नेहयात्री संस्थेच्या माध्यमातून घडलेले तुषार जोशी आणि आशिष कुलकर्णी या दोन सिने आणि मालिका कलावंतांची उपस्थिती प्रेक्षकांसाठी प्रमुख आकर्षण असणार आहे. भुसावळच्या सांस्कृतिक चळवळीतील सर्वात भव्य अशा राज्यस्तरीय स्पर्धेच्या निमित्ताने स्थानिक कलावंतांना संधी प्राप्त व्हावी व येथील नाट्यचळवळ वृध्दींगत व्हावी या उद्देशाने स्नेहयात्री प्रतिष्ठान सातत्याने प्रयत्नशील असते. नाट्यरसिकांचे मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळावे व इथे नाट्यसंस्कृती रुजावी याकरीता स्नेहयात्री करंडकाचे आयोजन होत असते, अशी माहिती संस्थेचे सचिव विश्वजीत घुले आणि अध्यक्ष विरेंद्र पाटील यांनी या पत्रकाव्दारे दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !