होळीनिमित्त पटणा शहरासाठी दोन अनारक्षित रेल्वे गाड्या
Two unreserved train trains for Patna city on the occasion of Holi भुसावळ : होळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून मुंबई ते पटनासाठी दोन अतिरीक्त अनारक्षित होळी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे.
अनारक्षित गाडी शनिवार, 23 मार्चला सकाळी 11 वाजता मुंबई येथून सुटल्यानंतर दुसर्या दिवशी दुपारी 1.50 वाजता ही गाडी पटना येथे पोहोचणार आहे तर परतीच्या प्रवासात ही गाडी रविवार, 24 मार्च रोजी पटना येथून संध्याकाळी 5 वाजता सुटेल व मुंबईला तिसर्या दिवशी सकाळी सहा वाजता पोहोचणार आहे. ही गाडी दादर, कल्याण, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, प्रयागराज छिक्की, बक्सर आणि आरा येथे थांबणार आहे.


