भुसावळात प्रभाग 24 मधील सिमेंट रस्त्याला अवजड वाहतुकीमुळे पडले तडे
भुसावळ : भुसावळ शहरातील प्रभाग 24 मधील साने गुरुजीनगर, बालाजी लॉनच्यामागे काही महिन्यांपूर्वी सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला मात्र याच भागातून अवजड वाहनाची वाहतूक होत असल्यामुळे या रस्त्याची काही दिवसातच दुरवस्था झाली असून रस्त्याला तडे जात आहेत.
अवजड वाहतुकीमुळे रस्त्याला पडले तडेे
शहरामध्ये जवळपास अनेक ठिकाणी काँक्रिटीकरण, डांबरीकरण, पेव्हर ब्लॉक रस्त्याचे काम झाले आहे. काही रस्त्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी निकृष्ट कामाची तर काही झालेल्या रस्त्याने अवजड वाहने जात असल्यामुळे रस्ता उखडण्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहे. शहरातील प्रभाग 24 मधील साने गुरुजी नगर, बालाजी लॉनच्या मागे काही महिन्यांपूर्वी रस्ता तयार करण्यात आला
होता. या रस्त्यावर क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असल्यामुळे रस्ता उखडण्यास सुरुवात झाल्याने या भागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


