वेल्हाळे ग्रामस्थांनी केली व्यसनांची होळी


The villagers of Velhale celebrated the Holi of addictions भुसावळ : जवळच असलेल्या वेल्हाळे गावात होळीचा सण पारंपरिक पद्धत्तीऐवजी वेगळ्या पद्धत्तीने साजरा करण्यात आला. प्रसंगी आयोजित कार्यक्रमात व्यसनांची आणि अंमली पदार्थांची प्रतीकात्मक होळी पेटविण्यात आली. पारंपरिक पद्धतीमध्ये मोठ मोठी लाकडे, गोवर्‍या आणि एरंडाचे झाड ज्याला होळीचा दांडा म्हणतात तो न वापरता थोड्याशा बारीक काड्या एकमेकांशी बांधून उभ्या करण्यात आल्या. त्याला सिगारेट, गुटखा, तंबाखू, जर्दा, खर्रा, बिडी हे शब्द लिहिलेले रंगीत कागद लावण्यात येवून या अमली पदार्थांचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. यामुळे लाकडे आणि गोवर्‍या ह्या दोघांची ही बचत झाली. पर्यावरणातील झाडाचे महत्त्व लक्षात घेता होळीसाठी एरंडाचे झाड वापरण्यात आले नाही. जाळण्यासाठी गोवर्‍यांचा वापर ही टाळण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाचे चिटणीस चंद्रकांत चौधरी, रोटरी क्लब ऑफ भुसावळचे सदस्य डॉ.दयाघन एस.राणे यांनी उपस्थितांना संबोधित केले. लोकनियुक्त सरपंच शारदा कोल्हे, भुसावळ येथील प्रख्यात समुपदेशक आरती चौधरी तसेच व्यसनमुक्ती केंद्र संचालक डॉ.वंदना वाघचौरे या तिघींच्या हस्ते होलिका दहनासाठी अग्निडाग देण्यात आला. प्रसंगी भुसावळ रोटरी क्लबचे सदस्य सारंग चौधरी, वेल्हाळे येथील उपसरपंच हेमंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत सरपंच शारदा कोल्हे आणि उपसरपंच हेमंत पाटील यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पुस्तिका देवून करण्यात आले. यशस्वीतेसाठी हेमंत पाटील उपसरपंच, रोटरी क्लब भुसावळचे सदस्य ारंग चौधरी आकाश कुरकुरे, गणेश पाटील, सचिन सुरवाडे, राजु राणे, सतीश पहेलवान, चेतन पाटील, सचिन पाटील, शशिकांत पाटील,दिनेश पाटील, उमाकांत पाटील, पुरषोत्तम पाटील, निखील पाटील, पंकज पाटील आदींनी परिश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !