बोरावल खुर्दमधील घरफोडीप्रकरणी भालशीवचा संशयीत जाळ्यात
यावल : तालुक्यातील बोरावल खुर्द येथे मागील आठवड्यात पद्माकर महाजन यांच्या घरातील भरदिवसा झालेल्या घरफोडीतील आरोपीच्या शोध मार्गावर असतांना या चोरी संदर्भात आणखी गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांना भालशीव येथील आरोपीला शिताफीने पकडण्यात यश आले आहे. यावल तालुक्यातील बोरावल खुर्द या गावात गत आठवड्यात पद्माकर महाजन यांच्या घरातून 69 हजार रुपये रोख आणि 27 हजार रुपयांचे दागिने असा एकूण 97 हजारांचा ऐवज चोरीला गला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एका पिंप्रीच्या एका संशयिताला चौकशी कामी ताब्यात घेतले होते. त्यानंतर सोमवारी पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांना भालशीव गावातील पोलिस पाटील सचिन तायडे यांनी दूरध्वनी करून या घरफोडीच्या चोरीतील आरोपी शंकर काशिनाथ सोनवणे हा आरोपी हडकाई नदीच्याकाठी असलेल्या सीताराम कोळी यांच्या केळीच्या शेतात लपून बसला असल्याची माहिती दिल्यानंतर त्यास सापळा रचून अटक केली मात्र पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढला मात्र त्यास सिनेस्टाईल पाठलाग करून अटक करण्यात आली.

