चाळीसगाव शहरात डॉक्टरांवर चाकूहल्ला : आरोपीला अटक


Knife attack on doctor in Chalisgaon city: Accused arrested चाळीसगाव : गाडीसमोर रीक्षा आल्यानंतर हॉर्न दिल्यानंतर संशयिताने तु मला ओळखत नाही का ? म्हणत डॉक्टरांवर चाकूने हल्ला केल्याची घटना स्टेशन रोड, पोस्ट ऑफिससमोरील दत्तवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली. याप्रकरणी डॉ.हरीष रमाकांत दवे यांच्या फिर्यादीवरून संभा देशमुख (चाळीसगाव) विरोधात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली.

डॉक्टरांवर केला चाकूहल्ला
डॉ.हरीष रमाकांत दवे (66 घाट रोड, चाळीसगाव) यांनी चाळीसगाव शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता ते होंडा सिटी कार (जी.जे.04 सी.जे.0457) मधून स्टेशन रोड, दत्तवाडीकडे जात असताना गाडीसमोर रिक्षा आल्यानंतर त्यांनी हॉर्न दिला व त्याचवेळी बाजूला उभा असलेला संशयिताने येत तू मला बघून हॉर्न का वाजवला, तू मला ओळखत नाही का, मी संभा देशमुख आहे, थांब तूला अद्दल घडवतो म्हणत सोबत आणलेल्या चाकूने तक्रारदाराच्या गळ्यावर वार केला व पुन्हा वार करीत असताना फिर्यादीने वार चुकवण्यासाठी डाव हात मध्ये घातल्याने डाव्या हाताच्या तळव्यास व करंगळीला दुखापत झाली. संशयिताविरोधात गुन्हा दाखल होताच त्यास अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले करीत आहेत.


कॉपी करू नका.