गोंभी प्रकरणात अर्जदार डॉ.स्वप्नील कोळंबे यांचे अपील फेटाळले


In the Gombi case, the appeal of the applicant Dr. Swapnil Kolombe was dismissed भुसावळ  : भुसावळ तालुक्यातील गोंभी येथील गट नं. 74/1 मिळकतीबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या अनुषंगाने नायब तहसीलदार यांनी सदरील नोंद नामंजूर केली होती. या आदेशाविरूध्द निर्णय रद्द करण्याकामी डॉ.स्वप्नील राजाराम कोळंबे व बाळू दौलत पाटील व इतर तिघांनी अपिल दाखल केले होते मात्र उपविभागीय अधिकारी यांनी हे अपिल नामंजूर करीत भुसावळ नायब तहसीलदारांचा निर्णय कायम ठेवला आहे.

मौजे गोंभी येथील फेरफार क्र. 1358 बाबत नायब तहसीलदार भुसावळ यांनी दिलेला निर्णय कायम करण्यात आला आहे. याच गटातील फेरफार क्र. 1327 दि.2-6-2022 या द्वारे रद्द करण्यात आला असल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे. या प्रकरणी वादीतर्फे अ‍ॅड.पी.डी.फेगडे यांनी तर प्रतिवादीतर्फे स्वतः सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी कामकाज पाहिले.


कॉपी करू नका.