सावखेडासीम ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेला अपर आयुक्तांकडून स्थगिती
Suspension of disqualification of Savkhedasim Gram Panchayat members by Additional Commissioner यावल : यावल तालुक्यातील सावखेडासीम येथील ग्रामपंचायत सदस्यांनी अतिक्रमण करीत शौचालय बांधले होते व त्यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवले होते. या निर्णयाविरूध्द सदस्याने अपिल दाखल केले होते व या अपिलात सदस्यांच्या अपात्रतेला अपर आयुक्तांकडून स्थगिती देण्यात आली.
अपिलात मिळाला दिलासा
सावखेडसीम, ता.यावल येथील ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गणा बडगुजर यांना सरकारी जागेवर अतिक्रमण करून शौचालय बांधकाम केल्याच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र ठरवले होते. या निर्णयाला आव्हान देत लक्ष्मण बडगुजर यांनी अपर आयुक्त नाशिक विभाग, नाशिक यांच्याकडे अपिल दाखल केले होते. यात जे मुख्य तक्रारदार उस्मान रमजान तडवी आहेत त्यांनी 30 जानेवारी रोजी प्रतिज्ञापत्राद्वारे तक्रार मागे घेत असल्याबाबत कळवल्याने या प्रकरणी नाशिक विभागीय अपर आयुक्त निलेश सागर यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती दिली. ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गणा बडगुजर यांना दिलासा मिळाला आहे.


