धुळे जिल्हा परीषदेतील लाचखोर कनिष्ठ लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात


सातव्या वेतन आयोगाच्या वेतन फरकाच्या रकमेचा प्रस्तावासाठी स्वीकारली सातशे रुपयांची लाच

धुळे : सातव्या वेतन आयोगाच्या वेतन फरकाच्या रकमेचा प्रस्तावासाठी सातशे रुपयांची लाच स्वीकारणार्‍या धुळे जिल्हा परीषदेतील लाचखोर कनिष्ठ लेखाधिकारी संगीता वसंतराव शिंपी (49, रा.चंपाबाग, साक्री रोड, धुळे) यांना धुळे एसीबीने सोमवारी सायंकाळी अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. शिरपूर तालुक्यातील बोराडीच्या 32 वर्षीय तक्रारदाराने याबाबत तक्रार नोंदवली होती.

लाच स्वीकारताच केली अटक
तक्रारदार यांचे वडील सेवानिवृत्त झाले असून त्यांचे सातव्या वेतन आयोगाच्या वेतन फरकाच्या रक्कमेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी तक्रारदारांकडे आरोपी संगीता शिंपी यांनी 24 रोजी सातशे रुपयांची लाच मागितली होती. याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. जिल्हा परीषद शिक्षण विभागाच्या कार्यालयाजवळ आरोपी शिंपी यांनी अ‍ॅक्टीव्हाच्या डिक्कीत पैसे टाकण्यास सांगितल्यानंतर त्यांनी रक्कम स्वीकारताच पथकाने त्यांना अटक केली. ही कारवाई धुळे एसीबीच्या पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे, निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, निरीक्षक प्रकाश झोडगे, सुधीर सोनवणे, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले , संदीप सरग, प्रशांत चौधरी, संदीप कदम, भुषण खलाणेकर आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !