भुसावळात पावणेदोन लाखांची घरफोडी
भुसावळ : घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी सुमारे पावणेदोन लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. शिवपूर कन्हाळा रस्त्यावरील सिद्धीविनायक पार्कमध्ये ही 22 ते 24 फेब्रुवारीदरम्यान ही घटना घडली. व्यवसायाने बोरींग चालक असलेले सुरेश चंद्रकांत तायडे हे शिवपूर कन्हाळा रस्त्यावरील सिद्धीविनायक पार्कमध्ये राहतात. 22 रोजी तायडे दाम्पत्य कामानिमित्त साकरी येथे नातेवाईकांकडे गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोररट्यांनी साधली. कपाटातील 50 हजारांची रोकड तसेच तीन तोळे वजनाचा व 60 हजार रुपये किंमतीचा हार, दोन तोळे वजनाची व 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन, 20 हजार रुपये किंमतीची एक तोळे वजनाची चैन व अंगठी तसेच 400 रुपये किंमतीचे कानातले डोरले चोरट्यांनी लांबवले. 24 रोजी दाम्पत्य आल्यानंतर चोरीचा उलगडा झाला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात तायडे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी करीत आहेत.

