चाळीसगाव तालुक्यातील प्रौढाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू


An adult in Chalisgaon taluka died due to electric shock चाळीसगाव : कपड्यांना इस्त्री करताना विजेचा जोरदार धक्का लागल्याने 57 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला. चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथे ही घटना घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विजय माधवराव साळुंखे (57, रा.खेडगाव, ता.चाळीसगाव) असे मयताचे नाव आहे.

मेहुणबारे पोलिसात नोंद
विजय साळुंखे हे आपल्या परिवारासह चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथे वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. बुधवार, 27 मार्च रोजी सकाळी 10 वाजता कपड्यांना इस्त्री मारण्याचे काम करत होते. त्यावेळी त्यांचा अचानक विजेचा धक्का बसल्याचे त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मेहुणबारे ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी सायंकाळी सहा वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक अनवर तडवी हे करीत आहे.


कॉपी करू नका.