प्रकाश आंबेडकर यांचा धक्कादायक आरोप : खासदार संजय राऊतांनी पाठीत खंजीर खुपसला


Prakash Ambedkar’s Shocking Allegation : MP Sanjay Raut stabs him in the back मुंबई : बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टिका केली असून राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटले आहेत. खासदार राऊत यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे ते म्हणाले आहेत. आम्हाला आघाडीच्या भ्रमात ठेवून लोकसभा निवडणुकीत जागा पाडण्याचे कारस्थान रचण्यात आले मात्र सिल्वर ओक निवासस्थानावर झालेल्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली होती, तुम्ही आमच्या विरोधात अकोल्यातून उमेदवार उभा करण्याचा मनोदय व्यक्त केला होता की नाही, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी एक ट्विट उपस्थित केला आहे.

मग का घेतली बैठक ?
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. संजय राऊत किती खोटं बोलणार? तुमची आणि माझी मते सारखीच असतील तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलावत नाही? फोर सीझन्स हॉटेलमध्ये 6 मार्चला झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला का बोलावले नाही? वंचितला आमंत्रण न देता आजही बैठक का घेत आहात?”, असे अनेक सवाल आंबेडकर यांनी उपेक्षित केले आहेत.

पाठीत सुरा खुपसणार्‍या व्यक्तीचा फोटो ट्विट
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी पाठीत सुरा खुपसणार्‍या एका व्यक्तीचा फोटो देखील पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये सुरा खुपसलेल्या व्यक्तीवर वंचित तर हल्ला करणार्‍या हातावर संजय राऊत असे लिहिलेले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या पोस्टची राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.


कॉपी करू नका.