आंतरराष्ट्रीय फ्लोअरबॉल स्पर्धेत नाईक महाविद्यालयाचा युरोपातील फिनलॅण्डमध्ये वाजणार डंका


रावेर : युरोपातील फिनलॅण्ड येथे 8 ते 14 मे दरम्यान होणार्‍या आंतरराष्ट्रीय फ्लोअर बॉल स्पर्धेसाठी रावेर येथील व्ही.एस.नाईक महाविद्यालयातील मयूर पाटील, यशवंत पाटील दोन खेळाडूंची यांची निवड झाली आहे. दोन्ही खेळाडूंनी महाराष्ट्र संघात खेळून महाराष्ट्र संघाला पदक प्राप्त करून दिले आहे तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या इंडिया कॅम्पसाठी दोघांची निवड झाली. या कॅम्पमधून संपूर्ण भारतातून दहा खेळाडूंची निवड झाली. त्यात व्ही.एस.नाईक महाविद्यालयात शिकत असलेल्या दोघी खेळाडूंची निवड झाल्याने रावेर महाविद्यालयात तसेच शहरवासीयांमध्ये उत्साह संचारला आहे.

खेळाडूंचे जल्लोषात स्वागत
दोन्ही खेळाडूंचे महाविद्यालयात जल्लोषात स्वागत करण्यात आले. महाविद्यालयात संस्थेचे प्रतीक नाईक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.व्ही. दलाल, उपप्राचार्य तथा क्रीडा समन्वयक प्रा.एस.यू.पाटील, उपप्राचार्य प्रा.एस.डी.धापसे, खेळाडूंचे मार्गदर्शक तथा महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.उमेश पाटील यांनी या खेळाडूंचे या निवडीबद्दल अभिनंदन केले. यावेळी सत्यशील धनले सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

 


कॉपी करू नका.