भुसावळात पालिका पेंन्शनर्स असोसिएशनचे लाक्षणिक उपोषण


भुसावळ- भुसावळ म्युन्सीपल पेंन्शनर्स असोसिएशनच्या कर्मचार्‍यांनी सोमवारी पालिका कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण केले. सर्वोच्च न्यायालयाने 23 सप्टेंबर 2019, 30 ऑगस्ट 2019 व 22 डिसेंबर 2019 रोजी दिलेलया आदेशाप्रमाणे सेवानिवृत्त कर्मचारी यांना पेंशनविक्रीची रक्कम व इतर आर्थिक लाभ कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचा-यांना त्वरीत अदा करावे, दिनांक 3 मार्च 2016 पासून 6 वा वेतन आयोगाचा फरक सर्वोच्च न्यायालय यांचा आदेश 7 एप्रिल 2017 व 10 फेब्रुवारी 2014 प्रमाणे त्वरीत अदा करावा, सन 2016 पासून पेंन्शनर्स व कार्यरत कर्मचा-यांना 7 व्या वेतनाचा फरक अदा करावा. लाड समिती व पागे समितीच्या शिफारसीनुसार त्वरीत नविन नेमणूका द्याव्यात, सफाई कामगारांना शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती दिल्या जाव्यात, महाराष्ट्र शासनाच्या हेल्थ मॅन्युअल नुसार लोकसंख्येनुसार सफाई कामगारांच्या जागा वाढविणेबाबतशासनाला ठराव करुन पत्रव्यवहार त्वरीत सुरु कराव्या, ज्या सेवानिवृत्त कर्मचा-यांना मानधनावर नेमणूक केली होती त्यांचा पगार त्वरीत अदा करावे, महाराष्ट्र शासनाच्या सन 2016 च्या परिपत्रकाप्रमाणे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर 1 महिन्यांचे आत पेंशनविक्री व इतर आर्थिक लाभ देणे बंधनकारक असतांनाही मुख्याधिकारी यांनी दिलेले नाहीत.परिपत्रकातील तरतुदीप्रमाणे मुख्याधिकारी व लेखापाल यांचेवर शिस्तभंगाची कारावाई करणेत यावी आदी मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू केला मात्र पालिका प्रशासन सातत्याने दूर्लक्ष करीत असल्याने सोमवारी अध्यक्ष एस. एल. पाटील यांच्या नेतृत्वात पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी लाक्षणिक उपोषण करुन प्रशासनानचे लक्ष वेधले. यावेळी एस.एल.पाटील, उपाध्यक्ष मधुकर इंगळे, सेक्रेटरी मधुकर पाटील, अरुण वाणी, प्रल्हाद कवटे, डिगंबर भोळे, प्रमोद राणे, किशोर वाघुळदे, अशोक सपकाळे, सुधाकर महाजन आदींसह पालिकेचे शेकडो सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.

मोर्चा, ठिय्याची दखल नाही
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशासह विविध मागण्यांसाठी पेंन्शनर्स कर्मचार्‍यांनी 27 जानेवारी रोजी पालिकेवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले होते मात्र यानंतरही पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी मोर्चाला जुमानले नाही. यापूर्वी दिलेल्या निवेदनांवरही मुख्याधिकारी डहाळे व तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी बबन तडवी यांनी दखल घेतली नाही. यामुळे लाक्षणिक उपोषणाचा मार्ग अवलंबला अशी माहिती यावेळी पेंन्शनर्स कर्मचार्‍यांनी दिली.

मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
पेंन्शनर्स कर्मचार्‍यांनी धरणे व साखळी आंदोलन सुरू केल्यावर मुख्याधिकारी करुणा डहाळे या कार्यालयात उपस्थित नाहीत. त्यांचा रजेचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात आहे काय? याबाबत आम्ही माहिती घेणार आहोत. आमच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दूर्लक्ष होत असल्याचे एस.एल. पाटील म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !