चोरीच्या गुन्ह्यात तीन वर्षांपासून पसार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात


The accused in the crime of theft has been in the net of crime branch for three years चाळीसगाव : चोरीच्या गुन्ह्यात तीन वर्षांपासून पसार असलेल्या आरोपीला जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. अतुल नाना पाटील (24, पथराड, ता.भडगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

तीन वर्षानंतर लागला आरोपीचा शोध
आरोपीविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा (311/2020) दाखल असून तब्बल तीन वर्षांपासून आरोपीचा शोध सुरू होता. जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय विजयसिंग पाटील, हवालदार लक्ष्मण पाटील, हवालदार अकरम शेख, हवालदार सुधाकर अंभोरे, नाईक राहुल पाटील आदींनी आरोपीला अटक केली. आरोपीला चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


कॉपी करू नका.