भुसावळातील रेल्वेच्या पीओएचमधील कामगाराचे विष प्राशन : दोषी अधिकार्‍याविरोधात कारवाईसाठी दोन तास कामबंद


Worker poisoned in railway POH in Bhusawal : Two hours lost for action against the guilty officer भुसावळ : भुसावळातील रेल्वेच्या पीओएचमधील सिनिअर सेक्शन इंजिनिअर एस.एम.टिकोतकर यांच्या जाच्याला कंटाळून रेल्वे कर्मचारी तुषार अरुण येवले (32) याने गुरुवारी विष प्राशन केल्यानंतर रेल्वे कर्मचारी प्रचंड संतप्त झाले. शुक्रवारी या घटनेचे पडसाद उमटल्यानंतर कर्मचार्‍यांनी दोषी अधिकार्‍यावर कारवाईच्या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी दोन तास काम बंद आंदोलन केले. उपमुख्य कारखाना प्रबंधक आर. एस. श्रीवास्तव यांनी आंदोलक कामगारांना भेटून संबधीत अधिकार्‍याला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कर्मचार्‍याची प्रकृती स्थिर
रेल्वे पीओएचमध्ये कर्मचारी तुषार अरुण येवले हे सेवेस आहेत मात्र त्यांच्यासह अनेक कर्मचार्‍यांना सिनिअर सेक्शन इंजिनिअर एस.एम.टिकोतकर यांच्याकडून मानसिक त्रास दिला जात आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पाचवर कर्मचार्‍यांना चार्जशीट दिले तर येवले यांनादेखील वारंवार त्रास दिला जात असल्याने त्यांनी गुरुवारी रात्री पत्नीला अधिकार्‍याकडून होणार्‍या त्रासाची माहिती देत आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले होते. येवले यांची मुलगी दवाखान्यात अ‍ॅडमिट असून तिला पाहिल्यानंतर येवले यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. विषप्राशन केल्यानंतर तुषार येवले यांच्यावर शहरातील डॉ. मानवतकर यांच्या हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.रेल्वे सुरक्षा बल व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी डॉ. मानवतकर हॉस्पीटलमध्ये भेट दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !