यावल शहरासह तालुक्यात उत्साहात घटस्थापना
यावल (रविवार, 11 ऑक्टोबर 2026) : यावल शहर व तालुक्यात सोमवारी नवरात्रोत्सवानिमित्त आई दुर्गेचे भव्य स्वागत करीत धार्मिक कार्यक्रम घेत घटस्थापना करण्यात आली. पोलीस ठाण्यांंतर्गत 181 मंडळे असून देखाव्यांससह सुशोभिकरणाचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.
दिवसभर घटस्थापनेची लगबग
शहर व पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या 57 गावात मोठ्या उत्साहात रविवारी घटस्थापना करण्यात आली. यात शहरात 40 सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळे असून तीन खाजगी मंडळांनी व पोलीस ठाण्याच्या हद्दीत 57 अशा एकूण 181 सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ व 17 खाजगी मंडळांकडून मोठ्या उत्साहात घटस्थापना करण्यात आली. शहर व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. अनेक ठिकाणी सायंकाळनंतर देखील घटस्थापनेची लगबग दिसून आली.





