यावल-चोपडा रस्त्यावर कार व अ‍ॅपेची धडक : तिघे गंभीर


Collision between a car and an app on the Yaval-Chopda road : Three serious यावल : यावल-चोपडा रस्त्यावर वढोदा गावाजवळ अ‍ॅपे रिक्षा आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने तिघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर प्रथमोवर करीत तिघांची प्रकृती गंभीर असल्याने तिघांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. हा अपघात शुक्रवारी दुपारी घडला.

अपघातात तिघे गंभीर
यावल-चोपडा रस्त्यावरील वढोदा गावाजवळ शुक्रवारी दुपारी यावलकडून चोपड्याकडे जाणारी अ‍ॅपे रिक्षा व चोपड्याकडून यावलकडे येणार्‍या कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये कार आणि अ‍ॅपेरिक्षाचे प्रचंड नुकसान झाले. अपघातात तौफिक शेख गुलाम (30), दानिश आसिफ खान (27, दोघे रा.साकळी) व संजय देविदास सोनवणे (40, रा.वढोदा) हे तीन जण जखमी झाले. जखमींना तातडीने घटनास्थळावरून 108 वाहनाद्वारे यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ आणण्यात आले.

यावल ग्रामीण रूग्णालयात डॉ. तुषार सोनवणे, अधिपरिचारीका मंजुषा कोळेकर, अमोल अडकमोल आदींनी प्रथमोपचार केले. या तिघांची प्रकृती गंभीर असल्याने तिघांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. हा अपघात नेमका कसा घडला हे मात्र स्पष्ट झाले नाही.


कॉपी करू नका.