बारामतीमध्ये नणंद विरोधात भावजयीत होणार लढत


In Baramati, Bhavjee will fight against Nanand मुंबई : महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही वेळातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली त्यामुळे बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय, लढत फिक्स झाली असून या लढतीकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. बारामती लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेंच्या नावाची अगोदरच घोषणा झाली होती. आपल्या लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी प्रचारालाही सुरुवात केल्याचं पाहायला मिळाले होते मात्र आज सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लढत स्पष्ट झाली आहे.

पवार कुटूंबातच रंगणार सामना
सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आता नणंद विरुद्ध भावजयी असा सामना रंगणार आहे. सुप्रिया सुळे चौथ्यांदा बारामतीमधून निवडणूक लढवत आहेत तर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच निवडणुकांच्या मैदानात उतरल्या आहेत. आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचे आभार मानले.

संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार : सुनेत्रा पवार
माझ्यासाठी आज सर्वात मोठा दिवस आहे. माझ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ऱाष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते अजित दादा यांनी विश्वास दाखवला. महायुतीमधील सर्वच नेत्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि काम करण्यासाठी दिलेल्या संधीबद्दल मी सर्वांचे आभार मानते, असे सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हटले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !