साकळी येथील खळ्यातून चोरट्यांनी बैलजोडी लांबवली
Thieves stole a pair of bullocks from the barn at Sakli यावल : यावल तालुक्यातील साकळी गावात एका शेतकर्याच्या खळ्यात बांधलेली बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. प्रारंभी सर्वत्र बैलजोडीचा शोध घेण्यात आला मात्र बैलजोडी कुठेच मिळून आली नाही. यावल पोलिसात शेतकर्याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
साकळी गावात दिनेश किसन लोधी हे शेतकरी राहतात. गावाला लागूनच त्यांचा गुरा-ढोरांसाठी खळा आहे. या खळ्यातून गुरांच्या दावणीला बांधलेली सुमारे 50 हजार रुपये किंमतीची निमाडी जातीची महागडी बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळीस खळ्याचे कुलूप तोडून चोरून नेली. ही घटना सकाळी उघडकीस आली. सर्वत्र बैलजोडीचा शोध घेण्यात आला मात्र बैलजोडी कुठेच मिळून न आल्याने शेतकरी दिनेश लोधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.

