भुसावळात 14 व 15 मार्च रोजी ‘स्नेहयात्री करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
भुसावळ : स्नेहयात्री प्रतिष्ठान, भुसावळतर्फे 14 आणि 15 मार्च रोजी दोन दिवसीय ‘स्नेहयात्री करंडक’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा भुसावळातील रेल्वेच्या श्रीकृष्णचंद्र सभागृह येथे होणार असून स्पर्धेच्या रंगमंचाला नगरसेवक मुकेश नारायण पाटील यांचे दिवंगत जेष्ठ बंधू स्व.उल्हास नारायण पाटील यांचे नाव देण्यात आले आले. स्पर्धेसाठी राज्यभरातील 15 नाट्यसंघ एकूण 15 एकांकिका सादर करणार आहेत.
दोन दिवस चालणार स्पर्धा
15 एकांकिकेतून जवळपास 200 कलावंत व तंत्रज्ञ आपली कला सादर करणार असून स्पर्धेच्या पहिल्या दिवशी शनिवार, 14 मार्च रोजी सकाळी 10 वाजेपासून एकांकिका स्पर्धेला प्रारंभ होईल. स्पर्धेचा समारोप समारंभ व बक्षीस वितरण रविवार, 15 मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता मान्यवरांच्या हस्ते होईल. या दरम्यान नृत्य, संगीत आणि नाट्याचा सुल संगम असलेल्या ‘स्नेहरंग’ या कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. स्पर्धेतील विजेत्या संघांना सांघिक व वैयक्तीक अशा स्वरुपाची 45 हजार रुपयांची रोख बक्षीसे, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येतील. सर्व सहभागी कलावंत व तंत्रज्ञांना सहभाग प्रमाणपत्रे दिली जातील. स्पर्धेचे परीक्षक म्हणून नाट्य व मालिका क्षेत्रातील प्रतिथयश कलावंत आमंत्रित केले जाणार आहेत.



स्पर्धा यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
स्पर्धेचे यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख म्हणून स्नेहयात्री प्रतिष्ठानचे नारायण माळी, उपाध्यक्ष मुकेश खपली, मुकूंद महाजन, प्रा.गिरीश कुलकर्णी, प्रशांत पाटील, राजेश पाटील, संजय यावलकर, हरीष कोळी, धनराज कुंवर, सुमित पाचपांडे, आदर्श पंडा, प्रदीप चौधरी, रामचंद्र डहाके, तुषार जोशी, आदर्श पंडा, रोहन माळी, अजय पाटील, रितेश वानखडे, दानिश, अभिषेक सोनवणे, आशिष कुलकर्णी, मयुश कुलकर्णी, मानसी पाटील, संजीवनी यावलकर, वैशाली कुलकर्णी, भारती वैष्णव, समृध्दी पाटील आदी परीश्रम घेत आहेत. स्पर्धा निशुल्क असून भुसावळकर रसिकांनी या दोन दिवसीय दर्जेदार सांस्कृतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्नेहयात्री प्रतिष्ठानचे सचिव विश्वजीत घुले आणि अध्यक्ष विरेंद्र पाटील यांनी केले आहे.
