जळगाव जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्या जाहिर
जळगाव : शासनाने प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी (न्यायालयीन व बँकीग विभाग वगळून) सन 2024 या कॅलेंडर वर्षात तीन स्थानिक सुट्या जाहिर केल्या आहेत.
यामध्ये सोमवार, 19 ऑगस्ट 2024 रोजी रक्षाबंधन तर सोमवार 2 सप्टेंबर,2024 रोजी पोळा आणि गुरुवार, 31 ऑक्टोबर 2024 रोजी नरक चतुर्दशी (दिवाळी निमित्त) या सणांसाठी स्थानिक सुटी जाहिर केली आहे.

