मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाहनाला अपघात : पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी


Muktainagar MLA Chandrakant Patil’s vehicle accident : Police personnel slightly injured मुक्ताईनगर : मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगर मतदारसंघात लग्नानिमित्त जात असताना त्यांच्या वाहनाला अपघात घडला. ही घटना सोमवारी दुपारी कुंड गावाजवळील जुने कुंड रस्त्यावर घडली.

सूत्रांच्या माहितीनुसार, आमदार पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस बोलेरो गाडी (क्रमांक एम.एच.19 ए 6018) ही समोरील गाडी (एम.एच.19 डी.व्ही.0005) या वाहनावर आदळली. या अपघातात पोलीस वाहनातील कर्मचारी एएसआय शरीफ काझी, पोलीस कॉन्स्टैबल तौफीक शेख, पोलीस कॉन्स्टेबल जवाहर पवार, गाडी चालक शब्बीर शेख यांना किरकोळ इजा झाली तर आमदार चंद्रकांत पाटील यांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !