भाजीपाल्याआड मद्याची वाहतूक : नवापूरनजीक 18 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

नंदुरबार गुन्हे शाखेसह नवापूर पोलिसांची संयुक्त कारवाई : सात जणांविरोधात गुन्हा


Transport of Liquor behind Vegetables : Illegal Liquor Stock of 18 Lakhs Seized Near Nawapur नवापूर : नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलिसांनी संयुक्त कारवाईत सुमारे 18 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त केला. विशेष म्हणजे पिकअप वाहनातून भाजीपाल्याआड मद्याची वाहतूक होत असल्याचे कारवाईत स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई मानली जात असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य तस्करीची बाब गांभीर्याने घेण्याची अपेक्षा आहे.

भाजीपाल्याआड सुरू होती वाहतूक
गुजरातमध्ये दारूबंदी असलीतरी चोरट्या मार्गाने तस्करी मोठ्या प्रमाणावर मद्याची तस्करी सुरू आहे. भाजीपाल्याआड सुरतकडे मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाल्यानंतर नवापूर तालुक्यातील बेडकी नाक्यावर नाकाबंदी लावण्यात आली. संशयीत पिकअप वाहन (क्र.एम.एच.18 बी. झेड.0248) आल्यानंतर तिची तपासणी केली असता वांगी, टोमॅटो या भाज्यांच्या क्रेटखाली दारूचा अवैध साठा आढळल्याने तो जप्त करण्यात आला. 18 लाख 38 हजार 560 रुपये किंमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली तर वाहनही ताब्यात घेण्यात आले.

सात संशयीतांविरोधात गुन्हा
नवापूर पोलिसात महेंद्र उर्फ राहुल राजेंद्र मराठे (27, उधना, गुजरात), सागर आबा भदाणे (24, सुरत, गुजरात), हरीष गोविंदा देविकर (27, सुरत गुजरात), मोहनेश उर्फ गोकूळ प्रभाकर चित्ते (32, साक्री, जि.धुळे), युवराज राजेंद्र जाधव (43, साक्री, जि.धुळे), राकेश तानाजी ठाकरे (29, साक्री, जि.धुळे), सचिन सुनील न्याहाळदे (24, जैताणे, ता.साक्री) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून गुजरात राज्यामध्ये दारू तस्करी वाढली माफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोलीस उपअधीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, नंदुरबार गुन्हे शाखा निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा.निरीक्षक दिनेश भदाणे व नवापूर व गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांनी केली.


कॉपी करू नका.