भुसावळच्या राजश्री नेवे आदर्श समाज सेविका पुरस्काराने सन्मानीत


भुसावळ : मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशन, जळगाव तर्फे भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार सोहळा नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडला. यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण, पत्रकारीता, आरोग्य अशा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यात भुसावळ येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा राजश्री उमेश नेवे यांना आदर्श समाज सेविका पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी समर्थ ग्रुपचे तथा ग.स. सोसायटी अध्यक्ष मनोज पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी डीगंबर देवांग, उद्योजक अनिल कासट, साहित्यीक अ.फ.भालेराव, स्वामी समर्थ ग्रुप संचालिका प्रतीक्षा पाटील, अ‍ॅड.स्वाती निकम, माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा शुभांगी बिर्‍हाडे, नोबल स्कूलच्या संचालिका अर्चना सूर्यवंशी, हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या संचालिका भारती काळे, फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, सलीम इनामदार, इम्रान शेख आदी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !